Aruna_Shirse
Aruna_Shirse 
पुणे

Success Story: नोकरी सांभाळत 'ती' झाली ‘सीए’; एकत्र कुटुंबाची मिळाली साथ!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घर आणि नोकरी सांभाळणे हे गृहिणींसाठी तारेवरची कसरत. कार्यालयातील कामाचा वाढता व्याप, स्वयंपाकापासून कुटुंबातील सदस्यांच्या विविध जबाबदाऱ्या आणि एक आई म्हणून मुलांसाठी सदासर्वदा उपलब्ध राहणे, असे बहुआयामी कार्य गृहिणी करत असते. पण याही पुढे जात कुटुंबाने साथ दिली आणि दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगली, तर हीच गृहिणी मोठ्या यशांची शिखरे सहज पादाक्रांत करते. पिंपळे-निलख येथील रहिवासी अरुणा कृष्णा कुंभार-शिरसे यांनी एकत्र कुटुंबाच्या पाठिंब्याने चक्क सनदी लेखापालची (सीए) परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

खासगी कंपनीमध्ये २०१० पासून अरुणा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यापासून त्यांची सीए बनण्याची इच्छा होती. विशेष म्हणजे लग्नानंतर त्यांचे पती अविनाश यांसह सासू-सासरे, दीर-जाऊ सर्वांनी परीक्षेसाठी अभ्यास करण्याचा आग्रह धरला. अरुणा यांनी सहा वेळा या परीक्षेसाठी प्रयत्न केले होते. त्या म्हणतात, ‘‘सकाळी नऊ ते रात्री
सात वाजेपर्यंत मी नोकरी करत होते. नोकरी सोडून अभ्यास करण्याचा आग्रह घरचे लोक करत होते. मूल लहान असून, त्यांच्याही शाळेचे बघणे, डबा करून देणे, अभ्यास घेणे याची जबाबदारीही माझ्यावर होती. त्यामुळे अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नव्हता.’’

लॉकडाउनमध्ये मात्र अभ्यासासाठी तुलनेने बरा वेळ मिळाल्याचे अरुणा सांगतात. कुटुंबीयांनीही या परीक्षेसाठी होईल ती मदत केली. त्यांच्या जाऊबाईंनी घरातील अतिरिक्त जबाबदारी घेतली.
कुटुंबातील एक ना एक सदस्य आपल्या परीने अरुणा यांचे काम कमी करण्याचा प्रयत्न करत होते. अरुणा यांनीही अभ्यासाची गती वाढविली होती. अखेर नोव्हेंबर २०२०च्या परीक्षेत त्या सीए म्हणून उत्तीर्ण झाल्या. हा माझा एकटीचा विजय नसून संपूर्ण कुटुंबाने दिलेल्या साथीचा विजय आहे, असे अरुणा सांगतात. सुनेने घरकाम सांभाळून सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा अभिमान शिवाजी शिरसे यांना आहे. सुनेने शिकावं आणि त्यांचा संसार आनंदी व्हावा एवढीच माझी इच्छा असल्याचे ते म्हणतात.

अरुणा यांच्या यशाचा मंत्र :
- प्रत्येक कामाची वेळ निश्चित करा आणि त्याला बांधील राहा.
- आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 
- ऑनलाइन उपलब्ध मोफत तासिकांचा भरपूर वापर
- यूट्यूबवरील व्हिडिओ कामाच्या वेळेत बघत
- स्वतः तयार केलेल्या व्हाइस नोट्स ऐकत
- स्वयं-अध्ययनाला प्राधान्य

ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि कुटुंबाची साथ मिळाली, तर यश निश्चित प्राप्त होते. छोट्या कुटुंबापेक्षा एकत्र कुटुंब अशा वेळी जास्त महत्त्वपूर्ण ठरतात. आता परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे जबाबदारीही वाढली आहे. एक उत्तम सीए म्हणून नेहमी अद्ययावत माहिती ठेवणे आणि प्रत्येक क्षणाला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे.
- अरुणा कुंभार- शिरसे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT